#beed #heavyrain #rainupdate #maharashtra #marathinews #esakal #sakal
बीड : जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजलविला. पीकांसह हजारो एकर शेतीही वाहून गेली, रस्ते, बंधारे, पुल वाहून गेले. नुकसानीच्या पाहणीसाठी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर गुरुवारी जिल्ह्यात आले. तालुक्यातील औरंगपूर - कुर्ला येथील बंधाऱ्याभोवती नदीने प्रवाह बदलून शेकडो एकर शेती वाहून गेली. याची पाहणी करण्यासाठी निघालेल्या श्री. केंद्रेकरांसह जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यासह पथकाने दिड किलोमिटर चिखल तुडवित स्पॉट गाठला. नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशीही संवाद साधला.
(व्हिडीओ : कृष्णा शिंदे)